News Flash

IPL 2021: कोलकाताच्या खेळाडूंना करोनाची बाधा; आजचा सामना पुढे ढकलला

आयपीएलवर करोनाचं सावट

दोन खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आल्याने आजचा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. (संग्रहित छायाचित्र)

आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना करोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाही. वरुण आणि संदीपची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आली आहे’, असं एएनआयला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण २९ सामने खेळले गेले आहेत. करोना फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांसाठी आज बंगळुरुचा संघ निळ्या जर्सीसह मैदानात उतरणार होता. या जर्सीचा लिलाव करून मिळालेल्या पैशांतून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत केली जाणार आहे.

काळाने साधला डाव! ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू

मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा अॅड झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय यांनी मायदेशी परतले आहेत. त्यानंतर घरच्यांना करोनाची लागण झाल्याने आर. अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे.

अनिल अंबानींना महाबळेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांचा दणका; इव्हिनिंग वॉक केलं बंद

स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल याला करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर संघात पुनरागमन केलं आहे. त्याचबरोबर वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे देशातील करोना स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:49 pm

Web Title: ipl 2021 today match was canceled due to corona infection of two kolkata players rmt 84
Next Stories
1 DC vs PBKS : मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा विजयी भांगडा!
2 IPL २०२१ : पंजाब किंग्जच्या नव्या कर्णधाराची खास कामगिरी
3 RR vs SRH : सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाचा षटकार!
Just Now!
X