जगातील क्रिकेटपटूंना मालामाल करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या आर्थिक कार्यपद्धतीमध्ये २०१४ वर्षांपासून महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. डॉलर्समध्ये होणारा खेळाडूंचा लिलाव २०१४पासून रुपयांमध्ये होणार आहे. आर्थिक बाजारातील सतत बदलत्या विनिमय दरांमुळे हा निर्णय अमलात येण्याची शक्यता आहे. या बदलामुळे खेळाडूंच्या वेतनात कशा प्रकारचा बदल होणार आहे, यासंदर्भात आयपीएल कार्यकारिणी समिती फ्रँचायजींना योग्य मार्गदर्शन करणार आहे.
२००८मध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामाच्या लिलावाच्या वेळी प्रती डॉलरला ४० रुपये असा दर देण्यात आला होता. आतापर्यंत भारतीय खेळाडूंना या विनिमय दराप्रमाणेच वेतन मिळते. मात्र रुपयांची किंमत सातत्याने घसरत असल्यामुळे विदेशी खेळाडूंना विकत घेण्यासाठी अधिक रक्कम खर्च करावी लागते.