कोरियामध्ये सुरु असलेल्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संघाने स्कीट नेमबाजी प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. याचसोबत भारताच्या गुरनिहाल सिंहने वैय्यक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे. गुरनिहाल, अनंतजित, आयुष रुद्रराजू या संघाने ३५५ गुणांसह दुसरं स्थान कायम राखत भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर घातली आहे. सोमवारी झालेल्या पात्रता फेरीत भारतीय जोडीने अव्वल स्थान मिळवलं आहे. याव्यतिरीक्त अन्य प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशाजनक खेळ केला. आतापर्यंत या स्पर्धेमधून भारताच्या दोन खेळाडूंनी ऑलिम्पिक पात्रतेचा कोटा मिळाला आहे. अपुर्वी चंदेला आणि अंजुम मुद्गील या खेळा़डू २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. यानंतरही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली मात्र ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणं त्यांना जमलं नाहीये.