चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धात, भारताच्या १७ वर्षीय दिव्यांश सिंहने ऑलिम्पिक कोटा कमावला आहे. १० मी. एअर रायफल प्रकारात दिव्यांशने रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीसह दिव्यांशने २०२० टोकियो ऑलिम्पिकचा कोटा कमावला आहे. पहिल्या दिवशी दिव्यांशने अंजुम मुद्गीलच्या साथीने दिव्यांशने मिश्र एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

१७ वर्षीय दिव्यांशने अंतिम फेरीत अखेरच्या क्षणापर्यंत चांगली झुंज दिली. यावेळीही दिव्यांश सुवर्णपदकाच्या जवळ होता. मात्र चीनचा प्रतिस्पर्धी झिचेंग हुईने ०.४ गुणांनी बाजी मारत सुवर्णपदकाची कमाई केली. दिव्यांशने अखेरच्या संधीत २४९.० गुणांची कमाई करत रौप्यपदक आपल्या नावे केलं. रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव्हला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.