News Flash

“बुमराह ‘बच्चा’ आहे, त्याची गोलंदाजी मी सहज ठोकून काढली असती…”

पाकिस्तानच्या माजी खेळाडूची दर्पोक्ती

जसप्रीत बुमराह हा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजीची भिस्त बहुतांश वेळा बुमराहवरच असते. बुमराहने आपल्या कामगिरीने कायम स्वत:ला सिद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ असो किंवा टीम इंडिया असो; बुमराह कायम फलंदाजांचा कर्दनकाळ ठरला आहे. पण पाकिस्तानचा अष्टपैलू गोलंदाज अब्दुल रझाक याला मात्र बुमराहचे गोलंदाजीतील श्रेष्ठत्व मान्य नाही. माझ्या काळी जर बुमराह गोलंदाजी करत असता, तर मी त्याच्या गोलंदाजीवर सहज फटकेबाजी केली असती, असे तो म्हणाला.

“मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यासमोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज गोलंदाजी करायचे. मी भल्या-भल्या गोलंदाजांसमोर फलंदाजी केली आहे. त्यामुळे बुमराहचे कौतुक मला सांगू नका. जर तो माझ्यावेळी गोलंदाजी करत असता, तर कामगिरीचे दडपण त्याच्यावर असते. मी तर त्याची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती. मी माझ्या काळात ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रम यांच्या सारख्या गोलंदाजांसमोर खेळलो आहे. माझ्यासाठी बुमराह एकदम ‘बच्चा’ आहे”, अशी दर्पोक्ती अब्दुल रझाकने केली.

अब्दुल रझाक

“जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. त्याने स्वत:मध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. त्याची गोलंदाजीची शैली काहीशी विचित्र आणि वेगळी आहे. त्यातच चेंडूच्या सीमचा (शिवणीचा) योग्य वापर कसा करावा हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळेच तो खूप परिणामकारक गोलंदाज ठरतो. पण मी माझ्या काळात अनेक प्रतिभावान आणि वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे माझ्या वेळी बुमराह असता, तर मला गोलंदाजी करताना बुमराहवरच दडपण आले असते. मी त्याच्या गोलंदाजीवर सहज चौकार-षटकार खेचले असते, असे रझाक म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 5:17 pm

Web Title: jasprit bumrah baby bowler i would have easily dominated him says former pakistan all rounder abdul razzaq vjb 91
Next Stories
1 IPL 2020 : “आधी सामने जिंकायला शिका”; नेटिझन्सकडून RCB ट्रोल
2 जेस्सी गिलने मानले धोनीचे आभार, कारण…
3 ICC Test Ranking : विराट कोहलीचा स्मिथला झटका, क्रमवारीत रहाणेला फटका
Just Now!
X