विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-० ने आघाडीवर आहे. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली. जसप्रीत बुमराने धडाकेबाज कामगिरी करत न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश ठेवण्याचं काम केलं आहे. बुमराहच्या गोलंदाजीचा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धसका घेतला आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलने, पुढील ३ सामन्यांत बुमराहचा फॉर्म हरवेल अशी आम्हाला आशा आहे.

“जसप्रीत बुमराह अखेरच्या षटकांतला सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडे धीम्या गतीने चेंडू टाकण्याची आणि बाऊन्सर टाकण्याची क्षमताही आहे. त्यामुळे तुम्ही बुमराहला टाळू शकत नाही. आम्ही एवढीच आशा करु शकतो की पुढील ३ सामने बुमराहसाठी वाईट ठरतील”, दुसरा सामना संपल्यानंतर गप्टील पत्रकारांशी बोलत होता.

न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिकेतनंतर भारतीय संघ ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतला तिसरा सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – गोलंदाजांनी सामना जिंकवला, सामनावीराचा पुरस्कार लोकेश राहुलला का??