निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात मुंबईच्या शिवशक्ती, पुण्याच्या शिवमुद्रा, शिवाई क्रीडा मंडळ आणि सांगलीच्या वंदे मातरम संघाने बाद फेरीत आगेकूच केली. पुरुष गटात बंडय़ा मारुती, सुनील स्पोर्ट्स क्लब, सोनार सिद्ध स्पोर्ट, गजानन स्पोर्ट्स क्लब, शाहू सडोली स्पोर्ट्स क्लब, राणाप्रताप कबड्डी संघ तसेच न्यू हिंद संघाने बाद फेरीत प्रवेश मिळवला. महिलांमध्ये शिवाई मंडळाने साताऱ्याच्या शिवाजी उदय संघावर २ गुणांनी निसटता विजय मिळवला. शीतल मारणेने उत्कृष्ट चढाया केल्या. मुंबईच्या शिवशक्ती संघाने ठाण्याच्या शिवतेज संघावर २२ गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. सांगलीच्या वंदे मातरम संघाने नाशिकच्या रचना स्पोर्ट्स क्लबवर तर पुण्याच्या शिवमुद्रा कबड्डी संघाने मुंबई उपनगरच्या सावित्रीबाई फुले संघावर ५ गुणांनी विजय मिळवला.