30 October 2020

News Flash

संगकारा सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज

कुमार संगकारा हा सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज असल्याचे मत भारताला १९८३साली विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आह़े.

| March 2, 2015 03:47 am

कुमार संगकारा हा सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज असल्याचे मत भारताला १९८३साली विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आह़े संगकाराने रविवारी खेळलेल्या लढतीत जलद शतक झळकावून श्रीलंकेला इंग्लंडविरुद्ध सहज विजय मिळवून दिला़ त्या विजयानंतर संगकारावर कौतुकांचा वर्षांव झाला़  
संगकाराचे कौतुक करताना कपिल म्हणाले, ‘‘५० षटके यष्टीमागे उभे राहिल्यानंतर फलंदाजी करणे सोपी गोष्ट नाही़ संगकारा आज अप्रतिम खेळला़  श्रीलंकेसाठी सामना जिंकून देणारा खेळाडू असल्याचे संगकारा वारंवार सिद्ध करत आह़े माझ्या मते तो सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज आहे आणि श्रीलंकन संघात त्याचे योगदान मोलाचे आह़े  सकारात्मक दृष्टीकोनातूनच तो मैदानात उतरतो़ ’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2015 3:47 am

Web Title: kapil dev sangakkara
टॅग Kapil Dev,Sangakkara
Next Stories
1 बार्सिलोनाचा विजय
2 सौरव घोषालचे आव्हान संपुष्टात
3 केरळ, सेनादल सर्वसाधारण विजेते
Just Now!
X