08 March 2021

News Flash

इराणी चषकासाठी शेष भारत संघाची घोषणा, करुण नायरकडे संघाचं नेतृत्व

१४-१८ मार्चदरम्यान नागपुरात रंगणार सामना

करुण नायर अध्यक्षीय संघाचा कर्णधार

रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाविरुद्ध बीसीसीआयने शेष भारत संघाची घोषणा केली आहे. १४ ते १८ मार्चदरम्यान नागपूरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी शेष भारत संघाचं नेतृत्व कर्नाटकच्या करुण नायरकडे सोपवण्यात आलेलं आहे. यंदाच्या रणजी हंगामात विदर्भाच्या संघाने अंतिम फेरीत दिल्लीवर मात करुन पहिल्यांदा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. या विजयानंतर विदर्भाच्या संघावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यामुळे घरच्या मैदानात इराणी चषकासाठी खेळताना विदर्भाचा संघ आपला फॉर्म कायम राखतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – सौराष्ट्रावर मात करुन कर्नाटकने पटकावला विजय हजारे करंडक

इराणी चषकासाठी शेष भारताचा संघ –

करुण नायर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू इश्वरन, आर. समर्थ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, के. एस. भारत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, जयंत यादव, शाहबाज नदीम, अनमोलप्रीत सिंह, सिद्धार्थ कौल, अंकित राजपूत, नवदीप सैनी, अतित सेठ

अवश्य वाचा – देवधर चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा, भारत ‘अ’ ‘ब’ संघात मुंबई-महाराष्ट्राच्या खेळाडूंचं वर्चस्व

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 1:03 pm

Web Title: karun nair to lead rest of india in irani trophy against vidarbha at nagpur
टॅग : Vidarbha
Next Stories
1 देवधर चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा, भारत ‘अ’ ‘ब’ संघात मुंबई-महाराष्ट्राच्या खेळाडूंचं वर्चस्व
2 आयपीएल सामन्यांमध्ये DRS ला बीसीसीआयची मान्यता
3 इंग्लंड, ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची विराट कोहलीच्या संघात क्षमता – सौरव गांगुली
Just Now!
X