वेंगर यांचा आर्सेनलच्या खेळाडूंना सल्ला
‘‘इंग्लिश प्रीमिअर लीगच्या जेतेपदाच्या शर्यतीत कायम राहायचे असल्यास मँचेस्टर सिटी क्लबविरुद्ध केलेल्या कामगिरीचा स्तर आगामी काळातही आर्सेनल क्लबने कायम राखणे आवश्यक आहे,’’ असा सल्ला क्लबचे प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांनी दिला.
सोमवारी झालेल्या सामन्यात आर्सेनलने २-१ अशा फरकाने सिटीवर विजय मिळवून अव्वल स्थानावरील लेईस्टर सिटी आणि त्यांच्यातील गुणाचे अंतर दोनवर आणले. त्यामुळे सातत्यपूर्ण खेळ केल्यास ते जेतेपदावर दावाही सांगू शकतात. शनिवारी आर्सेनलचा मुकाबला साऊदम्पटन क्लबशी होणार आहे. ‘‘सिटीविरुद्धचा विजय आमच्यासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे आमच्यातील आत्मविश्वास आणखी वाढला आहे. अशा सामन्यात विजय मिळवण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवणे आवश्यक असते. या विजयाचे मूल्यमापन कणखर सांघिक दृष्टिकोन आणि सांघिक खेळ असे करायला हरकत नाही. जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या क्लबविरुद्ध आम्ही सकारात्मक निकाल नोंदवला,’’ असे वेंगर म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2015 रोजी प्रकाशित
कामगिरीचा स्तर उंचावत ठेवा!
शनिवारी आर्सेनलचा मुकाबला साऊदम्पटन क्लबशी होणार आहे.

First published on: 26-12-2015 at 04:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keep better level of performance