इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही. आगामी काळातील आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे आयपीएलमध्ये आपण लिलावासाठी उपलब्ध नसणार असल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. पीटरसनने मागील वर्षी आयपीएलच्या मोसमात पुण्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. पुण्याच्या संघाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे होती. पीटरसन पुण्याकडून केवळ चार सामने खेळू शकला होता. दुखापतीमुळे आयपीएलमधून त्याला माघार घ्यावी लागली होती. डिसेंबर महिन्यातच पुण्याच्या संघाने पीटरसनला संघातून मुक्त करत लिलावासाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणाऱया आयपीएलच्या लिलावामध्ये पीटरसनची बोली लागणार होती. पण खुद्द पीटरसन याने स्पर्धेतून माघार घेतल्याने तो लिलावासाठी उपलब्ध नसेल.
पीटरसनने सध्या द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या भरपूर स्थानिक क्रिकेट सामने खेळले आहेत. याशिवाय, तो पाकिस्तान क्रिकेट लीगमध्येही खेळला होता. या लीगच्या दुसऱया मोसमातही तो खेळण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2017 रोजी प्रकाशित
‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमात पीटरसन नाही
पीटरसनने सध्या द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या भरपूर स्थानिक क्रिकेट सामने खेळले आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 03-02-2017 at 20:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kevin pietersen will not take part in ipl