जबरदस्त सांघिक कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघ सुसाट सुटला आहे. आठपैकी सात लढतीत विजय मिळवत त्यांनी बाद फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. पंजाबचा हा विजयरथ रोखण्याचे अवघड काम धडपडणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्ससमोर असणार आहे.
पंजाबसाठी ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर जोडी तडाखेबंद फॉर्ममध्ये आहे. जॉर्ज बेली, वृद्धिमान साहा, वीरेंद्र सेहवाग त्यांना चांगली साथ देत आहेत. मिचेल जॉन्सन, लक्ष्मीपती बालाजी आणि संदीप शर्मा हे त्रिकूट धावा रोखण्याबरोबरच विकेट्सही मिळवत आहेत.
दुसरीकडे कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, मात्र मधल्या फळीतील फलंदाजांची त्यांना साथ मिळत नसल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे.