न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतील सपशेल अपयशाला मागे सारून धरमशाला येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेद्वारे नवी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात सर्व क्रीडा प्रेमींचं कर्णधार विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण ‘रन मशीन’ विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाजवळ पोहचला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली हा विक्रम मोडू शकतो.

विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. पण मायदेशात होणाऱ्या या मालिकेतून विराटचा फॉर्म परत येईल असा कयास भारतीय क्रीडा प्रेमींना बांधला आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान १२ हजार धावा करण्यापासून विराट फक्त १३३ धावा दूर आहे. २३९ डावांत विराट कोहलीच्या नावावर ११,८६७ धावा आहेत. सध्या सर्वात वेगवान १२ हजार धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने ३०० डावांत १२ हजार धावा केल्या आहेत. या मालिकेत ३३ धावा काढताच सर्वात वेगवान १२ हजार धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होईल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने ३१४ डावांत तर श्रीलंकाचा माजी कर्णधारकुमार संगकाराने ३३६ डावांत १२ हजार धावा केल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीची बॅट शांत होती. न्यूझीलंडविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यात कोहली ५१,१५ आणि ९ धावा केल्या होत्या. अशामध्ये मायदेशात होणाऱ्या तीन या मालिकेत विराट कोहली आपला फॉर्म परत मिळवू शकतो.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, के. एल. राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, शुभमन गिल.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (कर्णधार), तेम्बा बव्हुमा, ऱ्हासी व्हॅन डर दुसेन, फॅफ डय़ू प्लेसिस, कायले व्हेरेन, हेन्रिच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन स्मट्स, अँडिले फेहलुकवायो, लुंगी एन्गिडी, लुथो सिपामला, ब्युरन हेंड्रिक्स, आनरिख नॉर्किया, केशव महाराज, जॉर्ज लिंडे, जानेमन मालन