2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहेत. भारतीय संघातील अनेक खेळाडूंसाठी हा विश्वचषक अखेरचा विश्वचषक ठरण्याची शक्यता आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालचा भारतीय संघ गेल्या काही महिन्यांमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. वेस्ट इंडिजचा माजी टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीनेही विराट भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देऊ शकतो असं भाकीत केलं आहे.

सॅमी सध्या युएईमध्ये टी-20 क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये खेळत आहे. यावेळी आगामी विश्वचषकाच्या अनुषंगाने सॅमीला विराटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “विराटकडे भारताला विश्वचषक जिंकवून देण्याचे सर्व गुण आहेत. 2019 नंतर होणाऱ्या विश्वचषकात तो खेळेल की नाही हे मला सांगता येणार नाही, मात्र विराट 2019 चा विश्वचषक भारताला नक्कीच जिंकवून देऊ शकतो.” सॅमीने विराटची स्तुती केली.

अवश्य वाचा – ….आणि विराट कोहली हसला

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएलनंतर भारतीय संघ विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होईल. त्यामुळे या स्पर्धेत यंदा विराट कोहलीचा भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अवश्य वाचा – विराटकडून काही गोष्टी शिकून घे, सौरव गांगुलीचा ऋषभ पंतला सल्ला