स्टीव्ह स्मिथची भारतीय कर्णधार विराट कोहलीशी तुलनाच करणे चुकीचे ठरेल. धावांचा पाठलाग करण्यात भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरपेक्षाही कोहली सरस आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे.

स्मिथ आणि कोहली हे दोघेही जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. मात्र पीटरसनने दोघांपैकी कोहलीला सर्वोत्तम ठरवले आहे. ‘‘दडपणाची परिस्थिती हाताळत धावांचा पाठलाग करीत देशाला सातत्याने सामने जिंकून देण्यात कोहली पटाईत आहे. त्यामुळेच स्मिथपेक्षा कोहली उजवा ठरतो.’’

तेंडुलकर आणि कोहली यांच्यापैकी कुणाची निवड करशील, या प्रश्नाला उत्तर देताना पीटरसन म्हणाला, ‘‘अर्थात कोहलीची. धावांचा पाठलाग करण्याची त्याची वृत्ती कौतुकास्पद आहे. दुसऱ्या डावातील फलंदाजीची त्याची सरासरी ८०हून अधिक आहे. त्याने अधिक शतके दुसऱ्या डावातच साकारलेली आहेत.