दोन वेळा आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सपुढे यंदा साखळीतच आव्हान संपुष्टात येण्याचे संकट उभे आहे. त्यामुळे बाद फेरीचे स्वप्न टिकवण्यासाठी रविवारी कोलकाताला आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानावरील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजयाची नितांत आवश्यकता आहे.
आयपीएलच्या नवव्या हंगामाच्या मध्यापर्यंत कोलकाता नाइट रायडर्सने गुणतालिकेत झोकात घोडदौड राखली होती. मात्र साखळीतील मागील दोन सामने गमावल्यानंतर आता ते चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे हैदराबादविरुद्धचा अखेरचा सामना चांगल्या निव्वळ धावगतीसह जिंकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. कारण यंदाच्या स्पध्रेत कोणत्याही संघाने वर्चस्वपूर्ण छाप न पाडल्यामुळे बाद फेरीतील अंतिम चार संघांचा फैसला हा रविवारी अखेरच्या दिवशीच होणार आहे.

सामन्याची वेळ : दु. ४ वा.पासून
प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स.