News Flash

IND v NZ : भारताच्या विजयात कृणाल पांड्याचं मोलाचं योगदान, केला अनोखा विक्रम

कृणाल पांड्याचे ३ बळी

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मात करुन ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आतापर्यंत भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये एकही टी-२० सामना जिंकू शकला नव्हता, हा भारतीय संघाचा न्यूझीलंडमधला पहिला विजय ठरला आहे. ३ बळी मिळवत कृणाल पांड्याने न्यूझीलंडच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. या कामगिरीसह कृणाल पांड्या न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत टी-२० सामन्यात दोनपेक्षा जास्त बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. पांड्याने कर्णधार केन विल्यमसन, कॉलिन मुनरो आणि डॅरेल मिचेलला माघारी धाडलं.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी धोनीचं संघात असणं गरजेचं – युवराज सिंह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2019 10:32 am

Web Title: krunal pandya played major role in indias win against new zealand
टॅग : Ind Vs Nz,Krunal Pandya
Next Stories
1 Video: DJ Bravo च्या नवीन गाण्यात धोनी-कोहलीचा जयजयकार
2 रणजी करंडक विजेता विदर्भ संघ ठरला करोडपती
3 विश्वचषकासाठी धोनीचं संघात असणं गरजेचं – युवराज सिंह
Just Now!
X