आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान लढतीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.  आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात रोहित शर्मा, अंबाटी रायडू आणि रविंद्र जडेजाच्या झुंजार अर्धशतकी खेळीमुळे भारताने ५० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात २४५ धावांची मजल गाठली. भारताकडून रोहित शर्मा(५६), अंबाती रायडू(५८) आणि रविंद्र जडेजा(नाबाद ५२) यांच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही.
सामन्यात भारताची सुरुवात थोडी अडखळत झाली. तिस-याच षटकात पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजने शिखर धनवला पायचित बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. धवनने अवघ्या १० धावा केल्या त्यापाठोपाठ विराट कोहलीही उमर गुलच्या गोलंदाजीवर फक्त पाच धावा करुन बाद झाला.  त्यानंतर रोहित, रहाणे, कार्तिक असे एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. अंबाती रायडू दुस-या बाजूला सामन्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याचाही अडसर सईद अजमलने दूर केला.
पाकिस्तानकडून सईद अजमल(३), हफीज आणि ताल्हा यांनी प्रत्येकी(२) आणि उमर गुलने (१) गडी बाद केले. यापूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, वरुण आरोन, ईश्वर पांडे, अमित मिश्रा, अंबाती रायडू आणि स्टुअर्ट बिन्नी.
पाकिस्तान : मिसबा-उल-हक (कर्णधार), मोहम्मद हफीझ, अहमद शहझाद, शरजील खान, शाहीद आफ्रिदी, उमर अकमल, सोहेब मकसूद, फवाद अलम, सईद अज्मल, अब्दुल रहमान, जुनेद खान, उमर गुल, अन्वर अली, बिलावल भट्टी, मोहम्मद ताल्हा.