यंदाच्या आयपीएलमध्ये १४व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनी सनरायझर्स हैद्राबादचा १७ रन्सने पराभव केला आहे. कोलकाताने १७२-६ एवढी धावसंख्या उभारली. प्रत्त्युत्तरादाखल हैदराबादची चांगली सुरूवात झाली. पण त्यांच्या टप्प्याटप्प्याने विकेट्स पडत गेल्या. त्यामुळे मॅचवरची सनरायझर्सची पकड सुटत गेली. कोलकात्याच्या बॅटिंगच्या वेळेस सुरूवातीला दोन झटपट विकेट् स गेल्या. इन फाॅर्म सुनील नरीन आणि कॅप्टन गौतम गंभीर आऊट झाल्याने कोलकात्याच्या हातून मॅच निसटते की काय अशी शंका येऊ लागली. पण राॅबिन उथप्पा आणि मनीष पांडेने कोलकाताचा डाव सावरला. दोघांनीही तुफान फटकेबाजी केली. उथप्पा ६८वर आऊट झाल्यावर पांडेने युसुफ पठाणच्या साथीने धावफलक हलता ठेवला. पण पांडे, सूर्यकुमार यादव आणि ग्रँडहोम आऊट झटपट आऊट झाले. पण तोपर्यंत कोलकाताचा स्कोअर चांगला झाला होता

गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादशी सामना करताना कोलकाता नाइट रायडर्सचे विजयी मालिका कायम राखण्याचेच ध्येय असणार आहे. इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील ही सर्वोत्तमतेची लढाई आहे. परंतु कोलकाताचा संघ गतवर्षी एलिमिनेटरमध्ये (बाद फेरी) पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक होता.त्यांचे मनोरथ आता पूर्ण झाले आहेत

एक विजय आणि एका पराजयानंतर दोन वेळा आयपीएल विजेत्या कोलकाताने गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर २१ चेंडू आणि आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर सलग ११व्यांदा (२०१२पासून) धावांचा पाठलाग यशस्वी करण्यात कोलकाताचा संघ यशस्वी ठरला. कर्णधार गौतम गंभीर कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सुनील नरिननेही आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले. या दोघांनी पॉवरप्लेच्या षटकांमध्ये ७६ धावांचा पाऊस पाडला. नरिनची जादूई फिरकी गोलंदाज अशी ओळख क्रिकेटजगतात होती. ती मागे टाकत नरिनने आपल्या तळपत्या बॅटचे तेज दाखवले. त्याने १८ चेंडूंत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ३७ धावा काढल्या. नियमित सलामीवीर ख्रिस लिन खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू न शकल्यामुळे त्याची जागा नरिनने आत्मविश्वासाने भरून काढली. पण आज तो फारशी चमक दाखवू शकला नाही

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादकडे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि फिरकी गोलंदाज रशिद खान ही महत्त्वाची अस्त्रे आहेत. गोलंदाजांच्या यादीत हेच दोघे आघाडीवर आहेत. अखेरच्या षटकांमध्ये भुवनेश्वर आणि आशीष नेहरा प्रतिस्पर्धी संघावर उत्तम अंकुश ठेवतात.  मुस्ताफिझूर रेहमानकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत.पण खराब बॅटिंगमुळे सनरायझर्स १७३ चं लक्ष्य गाठू शकले नाहीत.

LIVE UPDATES:

७:३७-  कोलकात्याचा सनरायझर्सवर १७ धावांनी विजय

७:२५- नमन ओझा झेलबाद, कोलकात्याची मॅचवर पकड

७:०८- युवराज सिंग झेलबाद, सनरायझर्सच्या हातून मॅच निसटण्याची चिन्हं

७:०३- सनरायझर्सना जिंकण्यासाठी ३५ बाॅल्समध्ये ६८ रन्स हवेत, युवराज सिंग अजूनही क्रीझवर

६:५२: सिक्सर! युवराज सिंगचा दमदार फटका

६:४९- सनरायझर्स काहीसे बॅकफूटवर, ११ ओव्हर्समध्ये ७८-३

६:२४- शिखर धवन पॅव्हेलियनमध्ये, सनरायझर्स ४६-१

६:२०- शिखर धवन आणि डेव्हिड वाॅर्नरची फटकेबाजी सुरूच

६:०७- फोर! शिखर धवनने फोर तडकावला

६:०३- शिखर धवन आणि डेव्हिड वाॅर्नर सनरायझर्सकडून  सलामीला

५:४८- हैदराबादपुढे १७३ चं आव्हान, कोलकाता १७२-६

५:२२- हाणामारीच्या ओव्हर्सना दणक्यात सुरूवात, मनीष पांडेचा दमदार सिक्सर

५:१८-  फोर ! युसुफ पठाणची आल्याआल्या फटकेबाजी

५:०५ – राॅबिन उथप्पा आऊट पण कोलकाता सुस्थितीत

५:०४ – फोर! उथप्पाची चौफेर फटकेबाजी

४:५५ – राॅबिन उथप्पाला जीवदान, शिखर धवनने कठीण कॅच सोडला

४:५०- १० ओव्हर्सनंतर कोलकाता ७५-२

४:४८- मनीष पांडेला स्टंपिंग करण्याची संधी हैदराबादने गमावली

४:४६- पहिला स्ट्रॅटेजिक टाईमआऊट

४:४१- राॅबिन उथप्पाचा आणखी एक सिक्सर!

४:२८- कोलकात्याचा कॅप्टन गौतम गंभीर आऊट! रशीद खानने केलं क्लीनबोल्ड

४:२७ :  राॅबिन उथप्पाचा सिक्सर!

४:२६- गौैतम गंभीर आणि उथप्पाचा संयमी खेळ. दोघांनीही धावफलक हलता ठेवला

४:१० – कोलकाताला पहिला हादरा, सुनील नरीन पॅव्हेलियनमध्ये