अखेर २०२८ सालचे ऑलिम्पीक खेळ कोणत्या शहरात रंगणार यावरचा पडदा आता उठलेला आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजलिस या शहराला २०२८ च्या ऑलिम्पीक खेळाचं यजमानपद भूषवण्याचा मान मिळणार आहे. आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसोबत झालेल्या करारानूसार लॉस एंजलिस शहराच्या महापौरांनी यासंदर्भात घोषणा केलेली आहे.

Vinesh, Anshu and Reetika earn three Olympic quota places
विनेश, अंशु, रितिकाला ऑलिम्पिक कोटा
Premier League Football Manchester City emphatic win sport news
प्रीमियर लीग फुटबॉल: मँचेस्टर सिटीचा दमदार विजय
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

या करारानूसार पॅरिस शहराला २०२४ सालच्या ऑलिम्पीक खेळांचं यजमानपद मिळालं आहे. २०१६ साली ब्राझीलच्या रिओ दी जनेरो या शहरात झालेल्या ऑलिम्पीकनंतर आगामी ऑलिम्पिक खेळांचा मान जपानच्या टोकीयो शहराला मिळाला आहे. यानंतर आगामी दोन ऑलिम्पिक खेळांचं यजमानपद कोणत्या शहराला मिळणारं याची सर्वांमध्येच उत्सुकता होती, त्यावर अखेर आज पडदा पडलेला आहे.

आगामी ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी दोन्ही शहरांना आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती १.८ दशलक्ष डॉलरचा निधी देणार आहे. या निधीमध्ये आगामी काळात गरजेनूसार २ दशलक्ष डॉलरची वाढही केली जाऊ शकते. दोन्ही शहरांच्या महापौरांनी यावेळी आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाख यांचे आभार मानले. याआधीही पॅरिस शहराने ऑलिम्पिक खेळांचं यजमानपद मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र सलग ३ वेळा त्यांना यामध्ये अपयश आलं. त्यामुळे मोठ्या प्रयत्नानंतर मिळालेलं हे यजमानपद आपल्यासाठी महत्वाचं असल्याचं मत पॅरिसच्या महापौरांनी व्यक्त केलं आहे.