वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या संतोष करंडक फुटबॉल स्पध्रेत आज महाराष्ट्र विरुध्द मिझोरम दरम्यानचा सामना चांगलाच रंगला. सुरुवातीच्या हाफ टाईमपर्यंत कोणत्याच संघाने गोल केला नसल्याने सामना ड्रा होण्याची चर्चा जोरात होती. मात्र, महाराष्ट्र संघातील जर्सी क्रमांक ७ शाहबाज मोहम्मद पठाणने ६६ व्या मिनिटाला ‘डी’च्या बाहेरून ताकदीने मारलेल्या शॉटवर गोल करत १-० ने आघाडी मिळवली अन् ती शेवटपर्यंत कायम राहिली.

मिझोरम संघाने दोन वेळा गोल करण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. मात्र, महाराष्ट्र संघाच्या गोलरक्षक ओवेस खानने गोल होण्याच्या भीतीपोटी डीच्या बाहेर येऊन बॉल पकडल्याने रेफ्रीने त्याला रेड कार्ड दाखवून तंबूत परत पाठवले. दरम्यान, जर्सी नंबर १७ श्रीकांतला सामना रेफ्रीच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या त्याला यलो कार्ड दाखविण्यात आले. महाराष्ट्राचा हा सलग तिसरा विजय असून संघाने आपले वर्चस्व कायम राखले. फस्ट हाफनंतर ७ व्या मिनिटाला महाराष्ट्र संघाच्या स्टेफिनच्या पासवर एॅरोन डिकोस्टाने बॉल मिस केला अन् त्यानंतर पुन्हा गोल करण्यासाठी आलेल्या जर्सी नंबर ७ शाहबाज पठाणने देखील शॉट चुकीच्या दिशेने मारल्यामुळे गोल हुकला. सलग दोन वेळा प्रतिस्पर्धी संघाला नमवून महाराष्ट्र संघाने आज दमदार विजय काबीज केला. महाराष्ट्राचा शाहबाज मोहम्मद पठाण मॅन ऑफ द मॅच ठरला. उद्या याच मोतीबाग मदानावर तामिळनाडू विरुध्द गोवा, असा सामना होणार आहे.