भारतीय संघाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आणि पार्टी नाही असे कसे चालेले? वेस्टइंडिजमध्ये तिरंगी मालिकेसाठी गेलेल्या भारताच्या युवा संघाने अशाच अगदी युवास्टाईलने धोनीचा वाढदिवस साजरा केला. मुख्यम्हणजे धोनीच्या बर्थडे पार्टीला कॅरेबियन खेळाडूंनीचीही उपस्थिती होती. मग विडिंज स्टाईलने धम्माल मस्तीही आलीच.
काल रविवार ७ जुलै माहीचा ३२वा वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला. या जल्लोषाची प्रचिती धोनीच्या या छायाचित्राने आपल्याला आलीच असेल. वाढदिवसाचा केकने धोनीचा संपुर्ण चेहरा रंगविण्यात आला. याचे छायाचित्र धोनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रदर्शित केले आणि त्यासोबत पार्टीबद्दल सर्वांचे आभारही मानले. यात धोनीने बर्थडेनिमित्त केलेल्या त्याच्या ‘केक मेकअम’ आणि केसांची विंडीज स्टाईल केल्याबद्दल वेस्टइंडिजच्या ब्रावोचे खास आभार मानले. यावरून धोनीच्या बर्थडे मेकअपची ही सर्व किमया ब्रावोने केली हे स्पष्ट झाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2013 1:41 am