गतविजेत्या मँचेस्टर युनायटेडने धडाक्यात सुरुवात करत स्वानसी सिटी संघावर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. रॉबिन व्हॅन पर्सी आणि डॅनी वेलबेक यांनी प्रत्येकी दोन गोल लगावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ३४व्या मिनिटाला पर्सीने पहिला गोल लगावत संघाला खाते उघडून दिले, त्यानंतर अठरा मिनिटांनंतर वेलबॅकने गोल लगावत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर या दोघांनी प्रत्येकी एक गोल लगावत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
 लिव्हरपूलची विजयी सलामी
लिव्हरपूलला आघाडीपटू डॅनियल स्टुरीजच्या एकमेव गोलच्या जोरावर स्टॉक सिटी संघावर १-० असा विजय मिळवता आला. सामन्याच्या ३७ व्या मिनिटाला डॅनियलने २० मीटर लांबीपासून जोरदार फटका लगावत संघाला एकमेव गोलची भेट दिली.
अर्सेनेलला धक्का
अ‍ॅस्टॉन व्हिला संघाने मातब्बर अर्सेनेलला ३-१ असे पराभूत करत जोरदार धक्का दिला. व्हिलाचा आघाडीपटू ख्रिस्तियन बेन्टेकने दोन गोल लगावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर अर्सेनेलला आपल्या घरच्याच मैदानात पहिल्या सत्रामध्ये एकच गोल करता आला.
चेल्सीचा विजयी प्रारंभ
चेल्सीने पहिल्याच सामन्यात हूल सिटी संघावर
 २-० अशी मात करत विजयी प्रारभ केला. चेल्सीच्या ऑस्करने १५व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाचे खाते उघडले, तर फ्रॅक लॅम्पर्डने २५व्या मिनिटाला गोल करत दुसरा गोल
केला.