पहिल्याच एकदविसीय सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६६ धावांनी दारुण पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३०८ धावांपर्यंत मजल मारु शकला. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं १-० नं आघाडी घेतली आहे. भारताविरोधात विजयी सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील आघाडीचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजीवेळी खेळाडूला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे तो यापुढील सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

३३ व्या षटक टाकणाऱ्या स्टॉयनिसला दुसरा चेंडू टाकल्यानंतर दुखापत झाली. त्यानंतर स्टॉयनिसनं तात्काळ मैदानात सोडलं. मार्कस स्टॉयनिसची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचं बोललं जात आहे. कारण त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी अथवा क्षेत्ररक्षण करण्यासाठी तो मैदानावर आलाच नाही. स्टॉयनिसच्या षटकातील उर्वरीत चेंडू मॅक्सवेलनं टाकले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे मार्कसला दुखापतीमधून सारवण्यासाठी फारच कमी वेळ आहे. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असेल तर दुसऱ्या सामन्यात स्टॉयनिस मुकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सिडनी वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६६ धावांनी मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ३०८ धावांपर्यंतच मजल मारु शकली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने ९० तर शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली, परंतू त्यांचे प्रयत्न व्यर्थच ठरले.