28 February 2020

News Flash

मॅचफिक्सींग खुनापेक्षा भयंकर अपराध – महेंद्रसिंह धोनी

आगामी डॉक्युमेंट्रीत धोनीचं महत्वपूर्ण विधान

“माझ्यासाठी आयुष्यात मॅचफिक्सींग हा खुनापेक्षा गंभीर अपराध आहे.” भारतीय संघाचा माजी आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या आगामी डॉक्युमेंट्रीमध्ये हे वक्तव्य केलं आहे. स्पॉटफिक्सींग प्रकरणी दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या प्रवासावर एक डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2018 साली पुनरागमन केल्यानंतर धोनीने आपल्या संघाला पुन्हा एकदा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं.

“माझा संघ त्या आरोपांमध्ये सहभागी होता, माझ्यावरही आरोप झाले. संघातल्या प्रत्येक सदस्यासाठी हा खडतर काळ होता. आमच्या प्रत्येक चाहत्याला असं वाटतं होतं की दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा ही कठोर होती.” ‘Roar of The Lion’ या आपल्या आगामी डॉक्युमेंट्रीमध्ये धोनीने आपली बाजू मांडली आहे. 20 मार्चरोजी ही डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार असून पहिला सामना गतवितेजा चेन्नई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे.

First Published on March 11, 2019 4:13 pm

Web Title: match fixing bigger crime than murder says ms dhoni in soon to be released documentary
Next Stories
1 दिपा कर्माकरच्या यशाला ‘बार्बी’चा सलाम, लॉन्च केली ‘दिपा बार्बी’
2 मोहालीच्या मैदानात ‘गब्बर-हिटमॅन’ची जोडी ठरली सरस
3 IND vs AUS: पराभवानंतर ऋषभ पंतवर टिका करणाऱ्यांना आकाश चोप्राने सुनावले, म्हणाला…
Just Now!
X