02 March 2021

News Flash

अबब ! एकाच डावात 23 षटकार, विंडीजच्या फलंदाजांची विक्रमी खेळी

मात्र पहिल्या सामन्यात इंग्लंडची बाजी

इंग्लंडविरुद्ध 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत विंडीजच्या संघाने धावांचा डोंगर उभा करुनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 361 धावांचं आव्हान इंग्लंडने जेसन रॉय आणि जो रुटच्या शतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. विंडीजकडून वन-डे संघात पुनरागमन करणाऱ्या ख्रिस गेलने वादळी खेळी करत 135 धावा केल्या. संपूर्ण सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला. विंडीजच्या डावात तब्बल 23 षटकार लगावले गेले. यातले 12 षटकार हे ख्रिस गेलने लगावले आहेत. एकाच डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा न्यूझीलंडच्या संघाच्या नावावर असलेला विक्रम विंडीजने आपल्या नावे जमा केला आहे.

अवश्य वाचा – गेलने मोडला आफ्रिदीचा विक्रम, झाला षटकारांचा बादशाह

विंडीजच्या नर्सने आदिल रशिदच्या गोलंदाजीवर लाँग ऑनवरुन षटकार खेचत विंडीजला विक्रम साधून दिला. याच सामन्यात ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीलाही मागे टाकलं. मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी केलेल्या स्वैर माऱ्यामुळे इंग्लंडने सामन्यात बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 8:32 am

Web Title: maximum west indies break record for number of sixes in an odi innings
Next Stories
1 पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर दादा म्हणतोय…
2 गेलने मोडला आफ्रिदीचा विक्रम, झाला षटकारांचा बादशाह
3 कबड्डीपटूंच्या मनमर्जीमुळे संघनिवडीसाठी दिरंगाई!
Just Now!
X