ओडीशाच्या भुवनेश्वर शहरात सुरु असलेल्या हॉकी विश्वचषकात यजमान भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयी सुरुवात केली. भारताच्या नवोदीत संघाने आफ्रिकेवर 5-0 मात केली. या पहिल्या विजयासोबत भारतीय संघाने एक अनोखा योगायोग जुळवून आणला आहे. हा योगायोग खरा ठरल्यास यंदाचा विश्वचषक भारतीय संघ जिंकेल अशी आशा भारतीय क्रीडा प्रेमींच्या मनात निर्माण झाली आहे.

अवश्य वाचा – Mens Hockey World Cup : भारतातल्या स्वच्छतेची परदेशी संघाना धास्ती

2016 साली भारतामध्ये ज्युनिअर हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा विश्वचषक भारताने जिंकला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे कॅनडाविरुद्ध पहिल्या सामन्यात मनदीप सिंहने सुरुवातीचा गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली होती. यानंतर भारताने आगामी सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. 2001 नंतर भारताने जिंकलेला हा पहिला ज्युनियर वर्ल्ड कप होता. याच मनदीपने आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पहिला गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली होती.

2016 साली भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाला विश्वचषक मिळवून देणाऱ्या संघाचं प्रशिक्षकपदही हरेंद्रसिंह यांच्याकडे होतं. तेच हरेंद्रसिंह सध्या भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतली भारतीय संघ ज्युनिअर विश्वचषकातल्या कामगिरीची पुनरावृत्ती करत बाजी मारेल असा विश्वास सर्व स्तरातून वर्तवला जातो आहे.

अवश्य वाचा – Mens Hockey World Cup 2018 : सलामीच्या सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात