करोना साथीच्या कालखंडात जैव-सुरक्षित वातावरणात सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार आहे.

करोनामुळे जगभरात टाळेबंदी लागू असताना जुलैमध्ये क्रिकेटला प्रारंभ इंग्लंड हा पहिला संघ ठरला होता. ते वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी काही खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले होते. पुढील कोणत्याही दौऱ्याला जाण्यापूर्वी खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅश्ले गाइल्स यांनी दिली.

भारताचा कर्णधार विराट कोहली, इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी करोना काळातील मानसिक आरोग्याबाबत चिंता प्रकट केली आहे.