इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आपल्या मजेशीव वक्तव्यामुळे चर्चेत असतो. हा माजी क्रिकेटपटू खेळाशी संबंधित कोणत्याही विषयावर आपले मत देण्यास कचरत नाही. आयपीएलमध्ये कोणत्या कर्णधाराच्या हाताखाली खेळायला आवडेल?, असे विचारले असता वॉनने रोहित शर्माचे नाव घेतले.

एका मुलाखतीत वॉनला विचारले गेले, की आयपीएलमध्ये कोणत्या कर्णधाराच्या हाताखाली खेळू इच्छित आहे. आयपीएलमध्ये एमएस धोनी, रोहित शर्मा, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, गौतम गंभीर हे यशस्वी कर्णधार आहेत. मात्र, वॉनने पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे नाव घेतले. वॉन म्हणाला, ”रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स, जगातील सर्वोत्कृष्ट टी-२० संघ, प्रश्नच येत नाही. रोहित शर्मा एक महान कर्णधार आहे. तो शांत राहतो, त्याची रणनिती योग्य असते आणि मला स्वत: ला रोहित शर्मासमवेत पाहायचे आहे.”

हेही वाचा – ठरलं तर! यूएईत होणार IPL २०२१चा उर्वरित हंगाम

रोहित IPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू

रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने सहा वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले. यापैकी त्याने पाच वेळा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना, तर एकदा डेक्कन चार्जर्समधील खेळाडू म्हणून विजेतेपदावर नाव कोरले. २०१३च्या मोसमात रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले. त्यावेळी रिकी पाँटिंगने कर्णधारपद सोडले होते.

हेही वाचा – ‘‘ऋषभ पंतने मध्यरात्री साडेतीन वाजता घरी येऊन माझी माफी मागितली होती”

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी तीन विजेतेपदांसह यशस्वी कर्णधाराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा चॅम्पियन बनवले आणि या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.