04 August 2020

News Flash

भारतीय खेळाडूंची शेरेबाजी पथ्यावर-जॉन्सन

प्रतिस्पर्धी खेळाडूला उद्देशून शेरेबाजी आणि टिप्पणी हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वैशिष्टय़. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात या शेरेबाजापुढे नमते न घेता प्रत्युत्तर देण्याचे

| December 24, 2014 01:05 am

प्रतिस्पर्धी खेळाडूला उद्देशून शेरेबाजी आणि टिप्पणी हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वैशिष्टय़. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात या शेरेबाजापुढे नमते न घेता प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या मिचेल जॉन्सनला उद्देशून भारतीय खेळाडूंनी जोरदार शेरेबाजी केली. मात्र ही खेळी भारताऐवजी जॉन्सनच्या पथ्यावर पडल्याचे उघड झाले आहे.
‘मी खेळपट्टीवर दाखल झालो तेव्हा आम्ही अडचणीच्या परिस्थितीत होतो. भागीदारी करणे अत्यावश्यक होते अन्यथा निकालाचे पारडे भारतीय संघाच्या दिशेने फिरले असते. मात्र फलंदाजी करताना आजूबाजूला शाब्दिक खेळी रंगल्यास मला आवडते. सुदैवाने भारतीय क्षेत्ररक्षकांनी हेच केले आणि मला मोठी खेळी करण्यासाठी फायदा झाला,’ असे खुद्द जॉन्सननेच सांगितले.
 भारतीय संघाच्या ४०८ धावांसमोर खेळताना ऑस्ट्रेलियाची ६ बाद २४७ अशी अवस्था झाली होती. त्या वेळी जॉन्सन खेळायला आला. त्याने ८८ धावांची निर्णायक खेळी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथसह त्याने १४८ धावांची भागीदारी साकारत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2014 1:05 am

Web Title: mitchell johnson hits indian for sledging
टॅग Mitchell Johnson
Next Stories
1 तिसऱ्या कसोटीसाठी भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त?
2 मुंबईच्या शेपटाची चिवट झुंज
3 बॉक्सिंग इंडियाला आयओएने मान्यता द्यावी
Just Now!
X