राज्य बुद्धिबळ स्पर्धा अजिंक्यपद स्पर्धा
महंमद शेख (ठाणे) व श्वेता गोळे (नागपूर) यांनी १९ वर्षांंखालील गटाच्या राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील अनुक्रमे मुले व मुली गटात अजिंक्यपद पटकाविले.
मॉडर्न महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत शेख याने आठ गुण मिळविले. रोशन रंगराजन व शंतनू भांबुरे यांचे प्रत्येकी साडेसात गुण झाले.
माध्यम गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान देण्यात आले. प्रसाद औरंगाबादकर याने चौथे स्थान मिळविले. निखिल दीक्षित, अनिष गांधी, अथर्व गोडबोले, संकर्ष शेळके, सुयोग वाघ व रणवीर मोहिते यांनी अनुक्रमे पाच ते दहा क्रमांक पटकाविले.
मुलींमध्ये श्वेता व साक्षी चितलांगे यांचे प्रत्येकी सात गुण झाले. मात्र माध्यम गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे पहिले दोन क्रमांक मिळाले.
ऋतुजा बक्षी व सलोनी सापले यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान घेतले. तन्मयी गणगे, धनश्री पंडित, रितिका देशपांडे, खुशी सुराणा, आदिती जोरी व धृती सुराणा हे अनुक्रमे पाच ते दहा क्रमांकांचे मानकरी ठरले. दोन्ही गटात पहिले चार क्रमांक मिळविणारे खेळाडू आगामी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.