एमएस धोनी यष्टीमागे विजेच्या वेगाने स्टपिंग करताना तुम्ही पाहिले असेल. पण आज न्यूझीलंडबरोबर झालेल्या अखेरच्या सामन्यात धोनीने अतिशय चपळाईने न्यूझीलंडच्या फलंदाजाला बाद केले आहे. धोनीने केलेल्या धावबादमुळे सामन्याला कलाटणी मिळाली आहे.

झटपट गडी गमावल्यानंतर न्यूझीलंडचा जिमी निशम मैदानावर स्थिरावाला होता. निशम भारतीय गोलंदाजांवर हवी झाला होता. त्यावेळीच रोहितने चेंडू केदारच्या हातात सोपवला. केदार जाधवच्या गोलंदाजीवर त्याच्याविरुद्ध पायचीतचे अपील करण्यात आले. त्याचवेळी निशम क्रीजमधून थोडा पुढे गेल्याचे पाहताच धोनीने चतुराईने त्रिफळा उडविला. निशमची बॅट क्रीजमध्ये पोहचण्यापूर्वीच धोनीने त्याला धावबाद केल्याचे तिसऱ्या पंचांकडून स्पष्ट झाले. धोनीच्या या धावबादमुळे न्युझीलंड संघाची मधली फळी कोलमडली.

अवश्य वाचा – IND vs NZ : हार्दिक पांड्या आणि षटकारांचं हे अनोखं नातं माहिती आहे का?

पाच सामन्याची मालिका भारताने ४-१ने जिंकली आहे. तब्बल दहा वर्षांनतर भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये विजय साकारला आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारताने न्यूझीलंडमध्ये विजयी पथाका फडकली आहे. चौथ्या सामन्यात मिळाल्या मानहाणीकारक पराभवातून बोध घेत भारताने पाचव्या सामन्यात विजय मिळवला आहे.

What a presense of mind by MSD. India has control of this match now #NZvIND #Dhoni pic.twitter.com/U3IPXM5pq8

— Vaibhav Gajendragad (@VaibhavMG05) February 3, 2019

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला 253 धावांचं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. अखेरचा वन-डे सामना 35 धावांनी जिंकत भारताने 5 वन-डे सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे. तब्बल 10 वर्षांनी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडचा संघ 44.1 षटकात 217 धावांपर्यंतच मजल मारु शकला.