जयपूर : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईचा विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी बलाढ्य दिल्लीशी सामना रंगणार आहे. मातब्बर फलंदाजांचा दोन्ही संघांत समावेश असल्यामुळे हा सामना रंगतदार होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत श्रेयस प्रभाव दाखवण्यात अपयशी ठरला होता. उपकर्णधार पृथ्वी शॉ हासुद्धा धावांसाठी झगडत आहे. याशिवाय यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव आणि तुषार देशपांडे यांच्यासारखे खेळाडू मुंबईच्या संघात आहेत. प्रदीप सांगवानच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त सलामीवीर शिखर धवनवर असेल.
मुंबईचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अखिल हेरवाडकर, सर्फराज खान, सुजित नायक, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, चिन्मय सुमार, साईराज पाटील, तनुश कोटियान, शाम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, अतिफ अत्तरवाला, शिवम दुबे, मोहित अवस्थी, हार्दिक तोमोरे, आदित्य तरे (यष्टीरक्षक), तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, आकाश पारकर, प्रशांत सोलंकी, सिद्धार्थ राऊत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2021 1:14 am