न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तीन शतकं ठोकणारा मुनरो हा पहिला फलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात कॉलिन मुनरोने बुधवारी १०४ धावांची झंजावाती खेळी केली. मुनरोने ५३ चेंडूत शतक झळकावलं. याआधी कॉलिन मुनरोने भारत आणि बांगलादेशविरुद्ध टी-२० सामन्यात शतक झळकावलं होतं. या शतकासह मुनरोने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावे असलेला २ शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे.
कॉलिन मुनरोच्या शतकी खेळीत १० षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलँडने वेस्ट इंडिजसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. या मालिकेत आपल्या फॉर्मशी झगडणाऱ्या मार्टीन गप्तिलने आक्रमक फलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने ५० धावांत २ विकेट घेतल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2018 4:11 pm