14 August 2020

News Flash

IPL मध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूंना क्रिकेट बोर्डाची परवानगी, पण…

न्यूझीलंडचे सहा खेळाडू होणार आयपीएलमध्ये सहभाही

आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होणाऱ्या न्यूझीलंडच्या सहाही खेळाडूंना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुद्दा लक्षात घेता आरोग्याची काळजी आणि सर्व सरकारी नियम पाळण्याची जबाबदारी ही खेळाडूंवर असेल असंही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय. न्यूझीलंडच्या संघाचे सहा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. ज्यात जिमी निशम (किंग्ज इलेव्हन पंजाब), लॉकी फर्ग्युसन (कोलकाता नाईट रायडर्स), मिचेल मॅक्लेनघन आणि ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स), केन विल्यमसन (सनराईजर्स हैदराबाद) आणि मिचेल सँटनर (चेन्नई सुपरकिंग्ज) यांचा समावेश आहे.

“आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सहा न्यूझीलंड खेळाडूंना क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र स्पर्धेतील सहभागाबद्दल अंतिम निर्णय हा त्यांचा असेल”, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ता रिचर्ड बूक यांनी पीटीआयला इ-मेल द्वारे दिली. भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता यंदाचं आयपीएल हे युएईमध्ये भरवलं जाणार आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवला जाईल. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरीही बीसीसीआयने स्पर्धेसाठी तयारी सुरु केलेली आहे. गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याबद्दल येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 11:09 am

Web Title: new zealand cricket to issue nocs to ipl bound players but have to do due diligence themselves psd 91
Next Stories
1 ५४ व्या वर्षी माईक टायसन करणार पुनरागमन
2 लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
3 इतिहास घडवण्यासाठी वेस्ट इंडिज सज्ज
Just Now!
X