News Flash

निदहास चषकातली खेळी आयुष्यभर लक्षात राहिल – दिनेश कार्तिक

भारताची बांगलादेशवर ४ गडी राखून मात

सामना संपल्यानंतर प्रेक्षकांचं अभिवादन स्विकारताना दिनेश कार्तिक

निदहास चषकात भारताने बांगलादेशवर अंतिम सामन्यात मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. विजयासाठी अखेरच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानंतर सर्वच स्तरातून कार्तिकच्या खेळीचं कौतुक होतं आहे.

अवश्य वाचा – Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

या विजयानंतर दिनेश कार्तिकनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत बांगलादेशविरुद्ध केलेली खेळी आपल्या आयुष्यातली सर्वोत्तम खेळी असल्याचं म्हटलं आहे. माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असल्याचंही कार्तिकने मान्य केलं.

अवश्य वाचा – ….म्हणून रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा तो षटकार पाहिलाच नाही!

तिरंगी मालिका संपल्यानंतर दिनेश कार्तिक आगामी इंडियन प्रिमीअर लिगचे सामने खेळणार आहे. यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिककडे कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तिरंगी मालिकेनंतर आयपीएलमध्ये कार्तिक कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – भारताची बांगलादेशवर मात, अंतिम सामन्यात झालेले हे १३ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 4:34 pm

Web Title: nidahs trophy 2018 this is my one of the best day in life says dinesh karthik
Next Stories
1 ..अन् बिग बींना मागावी लागली दिनेश कार्तिकची माफी
2 BLOG – ट्रॉफी जिंकलो कार्तिकमुळे, चर्चा मात्र कोहली, धोनीचीच!
3 IPL 2018 – मुंबई इंडियन्सच्या गोटात ‘या’ खेळाडूचं पुनरागमन
Just Now!
X