भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने मालिका जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून स्वत:कडेच ठेवण्यात यश मिळवलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. तर भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर हे आव्हान पार पाडले. या विजयात अनेक अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समावेश होता. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मालिका जिंकली. परंतु, विराट कोहलीनंतर रोहित शर्मा किंवा अंजिंक्य रहाणे नव्हे तर एक वेगळाच खेळाडू कर्णधार होईल असं मत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी व्यक्त केलं.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं BCCIला खुलं पत्र, वाचा नक्की काय आहे प्रकरण

“भारतीय संघात मी एक अतिशय प्रतिभावंत खेळाडू पाहिला. तो नवखा असला तरी त्याच्या खेळात अनुभव साफ दिसतो. जर अशाच परिपक्वतेने त्याने खेळ सुरू ठेवला तर मला खात्री आहे की विराट कोहलीनंतर भारताचा पुढचा कर्णधार तोच असेल. तो खेळाडू म्हणजे शुबमन गिल आणि माझ्या या दाव्यावर मला अजिबातच शंका नाही. खेळपट्टी तो अतिशय योग्य प्रकारे खेळत असतो. त्याच्यामध्ये सामना आणि खेळ समजून घेण्याची कुवत आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की त्याचं भविष्य खरंच खूप उज्ज्वल आहे”, असं शशी थरूर स्पोर्ट्सकीडाशी बोलताना म्हणाले.

IPL 2021: लिलावाआधी CSK ‘या’ दोन खेळाडूंना देणार सोडचिठ्ठी?

“त्याच्या खेळीत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कायम पाहायला आवडतील. त्याची फलंदाजी पाहताना खरंच खूप आनंद होतो. २१ वर्षीय गिलबद्दल मला आवडलेल्या गोष्टी म्हणजे त्याचा खेळपट्टीवरील संयमी स्वभाव आणि स्वत:बद्दलचा विश्वास. आसपास काहीही घडलं तरी त्याचा चेहरा कधीच नकारात्मक दिसत नाही. तो थकलेला दिसत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे खेळपट्टीवर असताना तो उगाच कोणतेही अंगविक्षेप किंवा हावभाव करत नाही”, अशी स्तुतीसुमनं थरूर यांनी त्याच्यावर उधळली.