भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान उद्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. अॅडलेड येथे पहिला सामना होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांनी कसून सराव केल्याचं दिसत आहे. भारतीय संघ चषकावर पुन्हा एकदा नाव कोरण्यासाठी मैदानात उतरत आहे. तर ऑस्ट्रेलियाता संघ परभावचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं ऑस्ट्रेलयाचा पराभव केला होता. यावेळी भारताकडून पुजारा आणि कोहलीनं सर्वाधिक धावा चोपल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याच्यामते विराट आणि पुजारासाठीची रणनिती आधीपासूनच तयार केली आहे. या दौऱ्यात पुजारा अथवा विराट कोहली यांच्यावर नव्हे तर अजिंक्य रहाणेवर त्यांचं लक्ष असणार आहे. यामागील कारणही त्यानं दिलं आहे. तो म्हणतो की, गेल्या दौऱ्यात रहाणेनं संघाला जोडण्याचं काम केलं होतं. त्यामुळेच यावेळी आमचं सर्व लक्ष अजिंक्य रहाणेवर असेल.

टिम पेन म्हणाला की, ‘ पुजाराने गेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. पण त्याच्याविरोधात रणनिती तयार आहे. पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यानंतरही भारतीय संघात अनेक युवा प्रतिभावंत खेळाडू आहेत. पंतने दुसऱ्या सराव सामन्यात वेगवान शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं आहे. पंतसारखे खेळाडू आम्हाला कसोटी विजयापासून रोखू शकतात. ‘

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अंजिक्य रहाणे भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, वॉर्नर-स्मिथ यांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघापेक्षा अधिक संतुलित आणि वरचढ दिसत आहे. तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची फलंदाजी कुमकुवत होईल, अन् याचा फायदा ऑस्ट्रेलियाचा संघाला होणार आहे.

स्मिथच्या दुखापतीवर अपडेट –
पहिल्या कसोटी सामन्यासाठी डेविड वॉर्नर उपलब्ध होणार नाही, परंतु आशा स्मिथ उपलब्ध असेल असी आशा आहे. यापूर्वीही बर्‍याचदा स्मिथला पाठीची समस्या जाणवत होती. एक दिवसाचा ब्रेक त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काल अधिक खबरदारीचा दिवस होता. तो आज प्रशिक्षण घेईल, आम्ही पाहू की तो कसा प्रतिसाद देतो. मला असे वाटते की सामान्यतः जर त्याच्या पाठीत त्रास होत असेल तर तो सहसा त्यातून बाहेर पडतो.