अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचने जपानच्या केई निशीकोरीचा पराभव करुन अंतिम फेरीत स्थान मिळवलेलं आहे. सर्बियाच्या जोकोविचने निशीकोरीवर ६-३, ६-४, ६-२ अशी मात करुन अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. जोकोविचने यंदाच्या विम्बल्डन ओपन स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे, त्यामुळे अमेरिकन ओपन जिंकून विक्रमी कामगिरी करण्याची चांगली संधी जोकोविचकडे आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोविचसमोर निशीकोरी दबावाखाली खेळताना दिसला. मात्र नंतर निशीकोरीने आपली लय पकडून जोकोविचला चांगली टक्कर दिली. पहिला सेट अवघ्या ३७ मिनीटांमध्ये जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये निशीकोरी जोकोविचला चांगली टक्कर दिली. मात्र या सेटमध्येही जोकोविचने आपला सर्व अनुभव पणाला लावत निशीकोरीला बॅकफूटला ढकललं. यानंतर निशीकोरी जोकोविचला फारशी टक्कर देऊ शकला नाही. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत जोकोविचचा सामना ज्युआन मार्टिन डेल पोत्रोशी होणार आहे.

अवश्य वाचा – US Open 2018 : दुखापतीमुळे राफेल नदाल सेमी फायनलमधून बाहेर