टोक्यो ऑलिम्पिक आधीच भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्याच्यावर बंदी घातलेला पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप आहे. अँटी डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने या कुस्तीपटूला सध्या निलंबित केले आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (डब्ल्यूएफआय) याची पुष्टी केली आहे.

सुमितने २०१८ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तो १२२ किलो वजन गटात ऑलिम्पिकसाठी पात्र झाला होता. यापूर्वी, २०१६ च्या ऑलिम्पिकच्या १० दिवस आधी कुस्तीपटू नरसिंग यादवही डोप टेस्टमध्ये फेल झाला होता. त्यानंतर तो ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकला नाही. नरसिंगवरही ४ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा – लवकर बरे व्हा!, पंतप्रधान मोदींनी फोनवरून केली मिल्खा सिंह यांच्या प्रकृतीची चौकशी

१० जूननंतर होणार परत चाचणी

भारतीय कुस्ती महासंघाने सांगितले की, सुमितची आणखी एक चाचणी १०  जून रोजी होईल. दरम्यान, त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. चौकशीनंतर सुनावणी केल्या जाईल.