News Flash

ICCच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर बाबर आझमने कोरले नाव

महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने पटकावला पुरस्कार

बाबर आझम

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेच्या सर्व स्वरूपात बाबरने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ९४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला १३ रेंटिग गुण मिळाले. या गुणांसह त्याने भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २७४ धावांचा पाठलाग करताना २६ वर्षीय बाबरने १०३ धावा फटकावत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले.

 

एप्रिल महिन्यात बाबरने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ७६च्या प्रभावी सरासरीने २२८ धावा केल्या. तर, ७ टी-२० सामन्यांत बाबरने ३०५ धावा केल्या. टी-२० मालिकेत पाकिस्तानने झिम्बाब्वेला २-१ असे पराभूत केले, या संघाआधी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून आला होता.

महिलांमध्ये हिलीला पुरस्कार

 

महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने महिलांमध्ये एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार नावावर केला. हिलीने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात ५१.६६च्या सरासरीने १५५ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रवर्गातील तीन उमेदवारांना मैदानातील कामगिरीच्या आधारे निवडले जाते. त्यानंतर या खेळाडूंसाठी स्वतंत्र आयसीसी मतदान अकादमीद्वारे मतदान केले जाते.

आयसीसीने या पुरस्काराद्वारे यावर्षी जानेवारीपासून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूची निवड करण्यास सुरूवात केली. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सर्वप्रथम हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट म्हणून निवडण्यात आले. मार्च महिन्यात भुवनेश्वर कुमारने या पुरस्कारावर नाव कोरले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेमध्ये भुवनेश्वरने किफायतशीर गोलंदाजी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 6:34 pm

Web Title: pakistan skipper babar azam received icc player of the month for april 2021 adn 96
Next Stories
1 KKRचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर चेन्नईला परतले
2 ‘यॉर्करकिंग’ लसिथ मलिंगा टी-२० वर्ल्डकप खेळणार?
3 रोम ऑलिम्पिकमध्ये खेळलेले भारताचे माजी फुटबॉलपटू फॉर्चुनाटो फ्रॅन्को कालवश
Just Now!
X