इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने आयपीएल स्पर्धेबाबत एक प्रतिक्रिया दिली होती. आयपीएलला जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणत सर्व क्रिकेट बोर्डाला या काळात आंतरराष्ट्रीय सामने आयोजित न करण्याचे आवाहन पीटरसनने केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर केविन पीटरसनने हे मत दिले होते. या मतावर पाकिस्तानी चाहत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पीटरसन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, “क्रिकेट बोर्डाला हे समजणे आवश्यक आहे की, आयपीएल हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करू नका. ही खूप सोपी गोष्ट आहे.”

 

पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रतिक्रिया

 

 

 

 

 

आयपीएलचे चौदावे पर्व 9 एप्रिल ते 30 मेदरम्यान खेळवले जाणार आहे. इंग्लंडच्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 2 जूनपासून प्रारंभ होत आहे. ‘आयपीएल’ संपल्यानंतर एकच दिवसानंतर या मालिकेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे इंग्लंडचे काही क्रिकेटपटू ‘आयपीएल’मध्ये सहभागाबाबत संभ्रमात आहेत. स्पर्धेच्या उत्तरार्धात ‘आयपीएल’ अर्धवट सोडणे किंवा राष्ट्रीय कर्तव्य टाळणे, हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे असतील. परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे संचालक अ‍ॅश्ले गाइल्स यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, इंग्लिश क्रिकेटपटूंनी ‘आयपीएल’पेक्षा राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देण्यासाठी आम्ही बंधन घालणार नाही.