News Flash

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : नियमाच्या उल्लंघनामुळे सुयश जाधव अपात्र

सुयश आजारपणामुळे २०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये सहभागी होऊ शकला नाही.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : नियमाच्या उल्लंघनामुळे सुयश जाधव अपात्र

ज ल त र ण

टोक्यो : नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पुरुषांच्या १०० मीटर बे्रस्टस्ट्रोक स्पर्धेतून पॅरा-जलतरणपटू सुयश जाधवला अपात्र ठरवण्यात आले. दिव्यांगांचा जागतिक जलतरण नियम क्रमांक ११.४.१ सुयशने मोडला. सुरुवात केल्यानंतर पहिल्या बे्रस्टस्ट्रोक किकच्या आधी आणि नंतर एकच बटरफ्लाय किकला परवानगी असते, असे हा नियम सांगतो. सुयश आजारपणामुळे २०० मीटर वैयक्तिक मिडलेमध्ये सहभागी होऊ शकला नाही.

बॅ ड मिं ट न

प्रमोद भगत विजयी

टोक्यो : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारताचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धांची विजयी सुरुवात केली. पुरुष एकेरीच्या एसएल-३ श्रेणीतील ‘अ‘ गटाच्या सामन्यात भगतने भारताच्याच मनोज सरकारचा २१-१०, २१-२३, २१-९ असा पराभव केला. युवा पलक कोहलीला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्याआधी, प्रमोद भगत आणि पलक कोहली जोडीने बुधवारी ब-गटातील सलामीच्या लढतीत द्वितीय मानांकित लुकास मझूर आणि फॉस्टिन नोएल जोडीविरुद्ध सामना ९-२१, २१-१५, १९-२१ अशा फरकाने गमावला.

ने म बा जी

अवनी अपयशी

टोक्यो :  नेमबाज अवनी लेखाराचे बुधवारी १० मीटर एअर रायफल प्रोन मिश्र क्रीडा प्रकारात पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आले. अवनीने एकूण ६२९.७ गुणांसह २७वा क्रमांक मिळवला. पुरुषांमध्ये सिद्धार्थ बाबू (६२५.५ गुण) आणि दीपक कुमार (६२४.९ गुण) यांना अनुक्रमे ४०वा आणि ४३वा क्रमांक मिळवला.

अ‍ॅ थ ले टि क्स

अमित, धरमवीरचे आव्हान संपुष्टात

टोक्यो : पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेतून भारताच्या अमित कुमार आणि धरमवीरचे आव्हान संपुष्टात आले. ३६ वर्षीय अमितने २७.७७ मीटर अंतरावर सर्वोत्तम फेक करून पाचवा क्रमांक आणि ३२ वर्षीय धरमवीरने २५.६९ मीटरसह आठवा क्रमांक मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 12:55 am

Web Title: paralympic games suyash jadhav disqualified due to violation of rules akp 94
Next Stories
1 प्रो कबड्डी लीग : प्रो कबड्डी लिलावाच्या अर्थकारणात ५.२८ टक्के घसरण
2 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची विजयी सलामी
3 भारत-इंग्लंड कसोटी मालिका : ओव्हलवर अश्विनला संधी?
Just Now!
X