ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धेची धूम सुरू आहे. या स्पर्धेत मंगळवारी अ‍ॅडलेड येथे सिडनी थंडर्स वि. अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स या संघात टी २० सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पिटर सिडल याने केलेला रन-आऊट विशेष चर्चेचा विषय ठरला. त्याने फलंदाजाला धावबाद करताना ‘धोनी स्टाईल’ गडी माघारी धाडला.

हार्दिक-नताशाच्या साखरपुड्यावर विराट म्हणतो…

उस्मान ख्वाजा हा सिडनी थंडर्स संघाकडून ५० चेंडूत ६३ धावांवर खेळत होता. त्यावेळी धाव घेताना अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळणाऱ्या सिडलने १४ व्या षटकात स्टंपकडे न पाहता फलंदाजाला धावबाद केले. एका क्षणी पीटर सिडल स्टंपच्या पुढे होता. फलंदाजाला धावबाद करण्यासाठी मागे वळण्याचा त्याच्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे स्टंपकडे न पाहताच त्याने चेंडू थेट स्टंपच्या दिशेने फेकला आणि ख्वाजा धावबाद झाला. उस्मान ख्वाजाला अशाप्रकारे बाद केल्याने सिडलने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

पीटर सिडलची ही कृती पाहुन अनेकांना भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. धोनीने अनेकदा अशाप्रकारे स्टंपकडे न पाहता फलंदाजांना धावबाद केले आहे.

भारताला World Cup जिंकवून देणाऱ्या खेळाडूवर एका वर्षाची बंदी

अटीतटीच्या सामन्यात अ‍ॅडलेड संघाचा ३ धावांनी पराभव

या सामन्यात सिडलने ४ षटकात ३० धावा देत २ बळी टिपले. ख्वाजा बाद झाल्यानंतर सिडनीचा कर्णधार कॅलम फर्ग्यूसनने याने अर्धशतक पूर्ण करत सर्वाधिक ७३ धावा केल्या आणि सिडनी थंडर्सला १६८ धावांपर्यंत मजल मारू दिली. १६९ धावांचा पाठलाग करताना अ‍ॅडलेड संघाला निर्धारित २० षटकात ९ बाद १६५ पर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे अ‍ॅडलेड संघाचा ३ धावांनी पराभव झाला.