News Flash

इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग : लिव्हरपूलचे अग्रस्थान अबाधित

दुसऱ्या क्रमांकावरील लेसिस्टर सिटीवर ४-० अशी मात

रॉबटरे फर्मिनो

दुसऱ्या क्रमांकावरील लेसिस्टर सिटीवर ४-० अशी मात

लेसिस्टर : गेल्या आठवडय़ातच क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद संघाला मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रॉबटरे फर्मिनोने केलेल्या दोन गोलच्या बळावर लिव्हरपूलने गुरुवारी रात्री झालेल्या इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील लेसिस्टर सिटीचा ४-० असा धुव्वा उडवून गुणतालिकेतील अग्रस्थान अधिक भक्कम केले.

किंग पॉवर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फर्मिनोने अनुक्रमे ३१ आणि ७४व्या मिनिटाला गोल नोंदवले. जेम्स मिल्नर (७१) आणि अ‍ॅलेक्झांडर अर्नाल्ड (७८) यांनी प्रत्येकी एक गोल करून फर्मिनोला उत्तम साथ दिली.

या विजयामुळे लिव्हरपूलच्या खात्यात १८ सामन्यांतून सर्वाधिक ५२ गुण जमा असून लेसिस्टर सिटी १९ सामन्यांतील ३९ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

अन्य सामन्यांत मँचेस्टर युनायटेडने न्यू कॅस्टलला ४-१ अशी धूळ चारली. अ‍ॅन्थोनी मार्शल (२४ आणि ५१वे मिनिट), मार्सन ग्रीनवूड (३६) आणि मार्कस रशफोर्ड (४१) यांनी युनायटेडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:46 am

Web Title: premier league football liverpool beat leicester city zws 70
Next Stories
1 धोनीची टिंगल करणारा शोएब मलिक तुफान ट्रोल
2 “भारतावर बहिष्कार घाला”; जावेद मियाँदाद बरळला…
3 “हिंदू-मुस्लीम वाद पाकिस्तानातच, आम्ही तर अझरूद्दीनला कर्णधार केलं होतं”
Just Now!
X