कोलकाता नाइट रायडर्सवर मात केल्यामुळे मनोधैर्य उंचावलेला पुणे वॉरियर्स संघ आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सशी लढणार आहे. गहुंजेच्या घरच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानाला सामोरे जाताना मोसमाचा शेवट गोड करण्यासाठीच पुणे वॉरियर्स उत्सुक आहे.
दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी १५ सामने खेळले आहेत आणि प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत. त्यांचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघास यंदा शेवटच्या स्थानावर राहण्याची नामुष्की पत्करावी लागणार आहे. त्यामुळेच सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतील अशी आशा आहे.
गतवर्षी पुणे वॉरियर्सचा संघ अखेरच्या स्थानावर होता. गतविजेत्या कोलकाताला ७ धावांनी हरविल्यामुळे पुण्याची बाजू वरचढ मानली जात आहे. या सामन्यात फलंदाजीत कर्णधार आरोन फिन्च, मनीष पांडे व युवराज सिंग यांनी चांगली कामगिरी केली होती. आहे.
गोलंदाजीत वेन पार्नेल व भुवनेश्वर कुमार यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली होती.  त्यांच्याबरोबरच परवेझ रसूल, अशोक दिंडा, अँजेलो मॅथ्यूज, युवराज सिंग, अजंथा मेंडिस, ल्यूक राईट यांच्याकडूनही प्रभावी यशाची अपेक्षा आहे.
सामना : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. पुणे वॉरियर्स
स्थळ : सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम, गहुंजे.
वेळ : दुपारी ४ वाजता