प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे लक्ष केंद्रित केलेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
किदम्बी श्रीकांतने पहिल्या लढतीत मलेशियाच्या वेई फेंग चोंगचा २१-१७, २१-११ असा केला. दुसऱ्या लढतीत त्याने इंडोनेशियाच्या ख्रिस्ती जोनाटनवर २१-१६, २१-१५ असा विजय मिळवला. अजय जयरामने जपानच्या ताकुमा युइडावर २१-१९, २१-११ असा विजय मिळवला. मात्र दुसऱ्या लढतीत पीटर कोकुलने त्याच्यावर २१-१७, २१-१७ अशी मात केली. बी. साईप्रणीतने पहिल्या लढतीत शाहझान शाह मिसफिहुलवर २१-१३, २१-१५ अशी मात केली. मात्र दुसऱ्या लढतीत टॉमी सुगिआर्तोने साईप्रणीतला २१-१४, १०-२१, २१-१८ असे नमवले. शुभंकर डे याने थायलंडच्या कंटाफोन वांगचोरेनवर २१-१९, २१-१६ अशी मात केली. मात्र दुसऱ्या लढतीत झ्यू साँगने शुभंकरचा १६-२१, २१-११, २१-१९ असा पराभव केला. समीर वर्माने पहिल्या लढतीत जपानच्या शो सासाकीला २१-१८, २१-१८ असे नमवले. दुसऱ्या लढतीत गोह सून हुआतने समीरवर ७-२१, २१-१३, २१-१६ अशी मात केली.
महिलांमध्ये पी. व्ही. सिंधूने स्वित्र्झलडच्या सब्रिना जॅक्वेटवर २१-१७, २१-१६ अशी मात केली. दुहेरी प्रकारात ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने अटीतटीच्या लढतीत मलेशियाच्या मेई कुआन चो आणि ली मेंग यिन जोडीवर २१-१४, १४-२१, २५-२३ असा विजय मिळवला.