News Flash

वर्णद्वेष खपवून घेणार नाही!; राजस्थान रॉयल्सची चाहत्याला ‘वॉर्निंग’

त्या कमेंटनंतर चाहत्याला केलं ब्लॉक

Racism in IPL : अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने या प्रकरणावर आपलं परखड मत मांडलं. IPL मध्ये मला संघातील काही खेळाडू काळू म्हणायचे, असं डॅरेन सॅमीने सांगितलं होतं. त्यावर एका चाहत्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, पण सॅमीने त्याला रोखठोख उत्तर देत गप्प केलं. पण त्यानंतर लगेच काही दिवसांतच सॅमीने ‘काळू’ या शब्दासंबंधी गैरसमज दूर झाला असल्याचे स्पष्ट केले.

राजस्थान रॉयल्स संघाच्या एका खेळाडूबद्दल संघाच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. त्यावर एका चाहत्याने जी कमेंट केली, ती वर्णद्वेषाला प्रोत्साहन देणारी होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाने त्या चाहत्याला ट्विट करून सरळ ताकीद दिली. “आम्ही केलेल्या एका ट्विटर पोस्टवर एका चाहत्याने एक कमेंट केली होती. ती कमेंट आमच्यातील एका खेळाडूला उद्देशून करण्यात आली असून ती वर्णद्वेषी कमेंट होती. आम्ही त्या कमेंटची ट्विटर व्यवस्थापनाकडे तक्रार केली असून त्या चाहत्याच्या अकाऊंटला ब्लॉक केले आहे. आम्ही वर्णद्वेष कोणत्याही परिस्थिती खपवून घेणार नाही हे साऱ्यांनी लक्षात घ्यावे”, असे ट्विट राजस्थान संघाकडून करण्यात आले.

काय होतं सॅमीचं प्रकरण

“मी IPL मध्ये हैदराबाद संघाकडून खेळत असताना मला काळू या नावाने हाक मारायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. त्या शब्दाचा संदर्भ लागल्यावर आणि समजल्यावर मला आणखीनच दुःख झालं आहे”, असं सॅमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले होते. त्यावर, काळू हा शब्द नेहमी वर्णद्वेष व्यक्त करण्यासाठी वापरला जात नाही, असे सांगत एका चाहत्याने सॅमीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, ‘जर काळू या शब्दाला वर्णद्वेषाची किनार असेल, तर तो शब्द कोणीच वापरू नये’, असे उत्तर देत सॅमीने चाहत्याला गप्प केलं होतं. पण त्यानंतर मात्र सॅमीने आणखी एक ट्विट करत ‘काळू’ शब्दाबाबत गैरसमज दूर झाल्याचे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 7:40 pm

Web Title: racism will not be tolerated says rajasthan royals slams user for racial abuse towards franchise player vjb 91
Next Stories
1 ना विराट, ना रोहित, ना धोनी… हा आहे सर्वात प्रभावशाली क्रिकेटर!
2 ‘तो’ भारत दौरा कायम लक्षात राहिला – वसिम अक्रम
3 IPL 2020 ची तारीख ठरली? या महिन्यात रंगणार थरार
Just Now!
X