विश्रांतीनंतर महेंद्रसिंह धोनी पुनरागमन करू शकेल का, हे तो स्वत:च स्पष्ट करू शकेल; परंतु ऋषभ पंत अपेक्षापूर्ती करू शकला नाही, तर लोकेश राहुलच्या पर्यायाचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले.

पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत राहुल यष्टीरक्षक-फलंदाज ही भूमिका यशस्वी पार पाडू शकेल, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी माझे संबंध बिघडल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर शास्त्री यांनी कडाडून टीका केली. मला गांगुलीविषयी नितांत आदर आहे; परंतु हे न कळणाऱ्यांना मी अजिबात किंमत देत नाही, असे शास्त्री यांनी सांगितले.