पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुल याच्या पोटात दुखू लागल्याने शनिवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असह्य़ वेदना होत असल्यामुळे त्याला अतिदक्षता खोलीत ठेवण्यात आले आहे. ‘‘राहुलला आंत्रपुच्छाचा आजार झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे,’’ असे पंजाब किंग्जच्या पत्रकात म्हटले आहे. राहुलच्या अनुपस्थितीत रविवारी रंगणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मयांक अगरवालकडे पंजाबचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.